आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्कर:गुटखा किंग ‘अहेफज’ला पोलिस कोठडी ; विक्की मंगलानी याची चौकशी सुरू

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाखों रूपयांच्या गुटखा कारवाई प्रकरणातील गुटखा किंग अहेफज मेमन याची सात दविसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. सध्या एलसीबीच्या ताब्यात असलेला विदर्भातील गुटखा तस्कर विक्रम उर्फ विक्की मंगलानी रा. अमरावती याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बाभुळगाव शहरातील विविध ठिकाणी साठवून असलेल्या गुटखा गोदामावर एलसीबीने धाड टाकून तब्बल ९८ लाख ३१ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून गुटखा किंग अहेफज मेमन याला ताब्यात घेतले होते. दरम्यान अहेफज मेमन याला एलसीबी पथकाने न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सात दविसाची पोलिस कोठडी सुनावली होती. या पोलिस कोठडी दरम्यान संपूर्ण माहिती एलसीबीने अहेफज मेमन याच्याकडून प्राप्त केली.

बातम्या आणखी आहेत...