आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंचा मुद्देमाल जप्त:गुटखा तस्कराच्या आवळल्या मुसक्या

यवतमाळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैधरित्या गुटखा, सुगंधित तंबाखूची साठवणूक करून त्याची विक्री करणाऱ्या एका तस्कराला एलसीबी पथकातील ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवार, दि. २४ नोव्हेंबरला दुपारी बाभुळगाव शहरातील नेताजी चौक वार्ड क्रमांक ११ मध्ये करण्यात आली असून अहेफाज मेमन रा. बाभुळगाव, असे ताब्यात घेण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा, सुगंधित तंबाखूची विक्री छुप्या पध्दतीने सुरू आहे. यापूर्वी अनेक कारवाया देखील पोलिसांकडून करण्यात आल्या आहे. मात्र जिल्ह्यात पुन्हा गुटखा, सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या तस्करांनी डोकेवर काढले आहे. अश्या तस्करांच्या मुसक्या अवळण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी जिल्ह्यातील ठाणेदार आणि एलसीबी पथकाला दिले होते. त्यानंतर काही दिवसातच पांढरकवडा पोलिसांनी लाखो रूपयांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत तस्करावर गुन्हे नोंद केले होते.

अश्याच प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून बाभुळगाव तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री होत होता. याबाबतची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून गुरूवारी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बाभुळगावातील नेताजी चौक वार्ड क्रमांक ११ मध्ये धाड टाकून अहेफाज मेमन या गुटखा तस्कराला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्यानंतर बाभुळगाव शहरातील एका पाठोपाठ एक अश्या अनेक ठिकाणाहून लाखो रूपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून त्याबाबतची चौकशी एलसीबी करीत आहे. वृत्तलिहिपर्यंत गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
बाभुळगाव शहरातील एका पाठोपाठ एक अशा अनेक ठिकाणाहून लाखो रूपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर, पथकातील नीलेश राठोड, यांच्यासह पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...