आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ येथून आर्णीकडे अवैधरीत्या गुटखा तस्करी करणारा ट्रक पकडुन त्यातील तब्बल ४८ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार १६ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास आर्णी पोलिसांनी महामार्गावर असलेल्या महाळुंगी पाँईंटवर केली. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. प्रतिबंधित करण्यात आलेला अवैध गुटखा वाहतूक करित असलेला ट्रक यवतमाळ वरून आर्णीकडे येत असल्याची गोपनीय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे आर्णी पोलिसांनी महाळुंगी पॉइंटवर नाकाबंदी केली. त्यात समोरुन आलेल्या एका लाल रंगाच्या ट्रकवर संशय आल्याने पोलिसांनी ट्रक थांबवुन त्याची तपासणी केली. त्यामध्ये सितार नावाचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्यामुळे आर्णी पोलिसांनी ट्रकमध्ये असलेल्या ४८ लाख रुपये किमतीच्या गुटख्यासह ट्रक आणि इतर साहित्य असा सुमारे ६८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यात चालक सरबत सिंह मुखत्यार सिंह वय ४९ वर्ष रा. वार्ड नं १५ सिकोला वस्ती दुर्ग ता. जिल्हा दर्ग छत्तीसगढ़,व त्याचा साथीदार अब्दुल गफार मोहम्मद अली वय ४८ वर्ष रा. मोहन नगर दुर्ग ता. जिल्हा दुर्ग छत्तीसगढ यांचा समावेश आहे.
या वाहनाची पाहणी केली असता, ट्रकच्या मागच्या डाल्यामध्ये मागील बाजूस ज्यूटच्या पोत्याला विलायची कचऱ्याचे स्टिकर लावून होते. ज्यूटच्या पोत्याच्या मागे पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये सितार नावाचा गुटखा भरलेले ८१ पोते मिळाले. या पोत्यामध्ये आणखी ६ लहान पोते व त्यामध्ये प्रत्येकी ५० सितार या गुटख्याचे पुडे आढळले. त्याची मोजणी केली असता २४ हजार ३०० पुडे आढळले. े एकूण ४८ लाख ६० हजार रुपये किमतीचा गुटखा व आयशर ट्रक क्रमांक सी. जी ०८ ए ६१०७ ज्याची किंमत विस लाख रूपये असा मुद्देमाल आर्णी पोलिसांनी जप्त केला. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक पीतांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक किशोर खंडार, संजय भारती, अरुण पवार, मनोज चव्हाण, मिथुन जाधव यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.