आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकाने फोडली:चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री 2 दुकाने फोडली

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मेनलाईन परिसरात चोरट्यांनी हैदोस घातला असून एकाची दिवशी दोन दुकाने फोडून चक्क अडीच लाखाची रोख लंपास केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आसमा ट्रेडींग कंपनी आणि युनायटेड ट्रेडर्समध्ये घडली. या प्रकरणातील तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांचा शोध शहर पोलिस घेत आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील मेनलाईन परिसरातील ‘आसमा ट्रेडींग कंपनी’ आणि ‘युनायटेड ट्रेडर्स’ ही दोन दुकाने चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री टार्गेट केली. यातील एका दुकाने शटर वाकवून तर दुसऱ्या दुकानातील वरच्या मजल्यावर असलेल्या टिनाचे पत्रे कापून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील रोख रक्कम असा एकूण दोन लाख ३९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही बाब रविवारी सकाळी दुकान मालकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब बुधावत यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, सीसीटीव्हीत तीन संशयित कैद झाले असून त्याचे चेहरे अस्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...