आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्स तर्फे महिलांचा हळदी कुंकू प्रोग्राम आणि डॉक्टर निकिता चव्हाण स्कीन स्पेशालिस्ट यांचे सौंदर्य विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे दि. २९ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि इनरव्हीलच्या प्रणेत्या ऑलिव्हर गोल्ड डीग यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांबरोबर विविध गेम डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. यावेळी नुकताच नाशिकला पार पडलेली इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये आयएसओ कॉम्पिटिशन मध्ये प्रणिती यरपुरडे चा सेकंड क्रमांक आल्याबद्दल सर्व क्लबने सत्कार घेतला. तसेच महिलांना डॉ. निकिता चव्हाण स्कीन स्पेशालिस्ट यांचे सौंदर्य विषयी मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कीर्ती राऊत, अस्तित्व फाउंडेशन अध्यक्ष अलका कोथळे, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी, पुनम जयपुरिया, स्वामिनी मंडळाच्या सचिव मीना शर्मा, क्लबचे अध्यक्ष प्रतिभा पवार, सचिव अबोली डीक्कर, डॉ.अंजली गवारले, उपाध्यक्ष संगीता पुरी, कोषाध्यक्ष स्मिता दुर्गे, आयएसओ प्रणिती येरपूडे, एक्झिक्युटिव्ह मेंबर वर्षा मोकाशे, डॉ. सुधा खडके, उषा दिवटे, बबीता तोडसाम, संगीता पेंदोर, प्रतिभा शिंदे,साधना पवार, मनीषा वानखेडे, आदी सदस्य आणि प्रेषक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुधा खडके यांनी केले. गेम आणि डान्स स्पर्धा स्वरामुळे आणि श्रावणी मेश्राम यांनी आयोजन केले होते. आभार प्रणिती येरपूडे केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.