आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहरात पहिल्यांदाच 29 जानेवारीला होणार हाफ मॅरेथॉन

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती बाबत जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात पहिल्यांदाच हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन २९ जानेवारी २०२३ रोजी यवतमाळ शहरात होणार असून यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

बदलत्या कार्य संस्कृतीमुळे बैठी जीवनशैली निर्माण झाली आहे. त्यामुळे तरुण वयातच अनेकांना हृदयविकारासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. समाजामध्ये शरीराच्या सुदृढतेबाबत जनजागृती होण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन, फार्मसी असोसिएशन, जिल्हा प्रशासन, जिल्हा केमिस्ट असोसिएशन, क्रिडा भारती स्पोर्ट्स आणि जिल्ह्यातील क्रीडा संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात पहिल्यांदाच हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. ६ डिसेंबर रोजी नियोजनाची पहिली बैठक पार पडली. यावेळी मॅरेथॉनसाठी नोंदणी संकेतस्थळ सुरू करण्यात आले असुन https://www.townscript.com/e/ima-yavatmal-health-marathon नागरिकांनी यावर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ही मॅरेथॉन २१ किलोमीटर, १० आणि ५ किलोमीटरसाठी होणार असुन याशिवाय ३ किलोमीटर दौड प्रोत्साहन मिळण्यासाठी ठेवण्यात आली आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी तीनशे रुपये नोंदणी फी ठेवण्यात आली असून त्यासाठी अटी व शर्ती संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आणि यशस्वी आयोजन करण्याचा निर्धार या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.या बैठकीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, आयएमए चे अध्यक्ष डॉ. रत्नपारखी, सचिव डॉ. शरद राखुंडे, अॅथलेटीक्स असोसिएशनचे अनंत पांडे, राजु जॉन, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

जिल्हाधिकऱ्यांनी दिल्या महत्वाच्या सूचना
मॅरेथॉनसाठी कॉलेज, वेगवेगळ्या वर्ग गटात प्रसिद्धी करा, मॅरेथॉनच्या तयारीसाठी लोगो अंतिम करावा, समित्या गठित करुन त्यांच्यावर जबाबदारी सोपवावी, मॅरेथॉनसाठी बक्षिसे ठेवण्यात यावी, इतर जिल्ह्यातून येणाऱ्या धावपटूंसाठी संकेतस्थळावर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती देण्यात यावी, त्यांच्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट याची माहिती सुद्धा संकेतस्थळावर द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...