आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएप्रिल महिना अर्धा संपला आहे. तरीसुद्धा काही पंचायत समितीतील शिक्षकांचे फेब्रुवारी, मार्च महिन्याचे वेतन झाले नाही. परिणामी, शिक्षकांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागते. यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शिक्षकांकडून केल्या जात आहे.अनियमित वेतनामुळे शिक्षक त्रस्त झाले आहे. बऱ्याच वेळा शिक्षकांनी आंदोलने, निदर्शने केली. प्रत्येकवेळी आश्वासनाशिवाय काहीच मिळत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सातत्याने विलंबाने होत असलेल्या वेतनामुळे शिक्षकांना बँका, पतसंस्थांचे हप्ते परतफेड करताना अडचणी येत आहे. व्याजाचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. दरवर्षी मार्च एन्डीगच्या नावाने सलग दोन ते अडीच महिन्यापर्यंत शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा करावी लागते. असे असताना यंदा मात्र, काही पंचायत समितीतील शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचेच वेतन अदा केले नाही. तर मार्च महिना लोटला असून, एप्रिल महिना सुद्धा अर्धा झाला आहे. तरीसुद्धा फेब्रुवारी, महिन्याचे वेतन झाले नाही. निधी उपलब्ध नसल्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची प्रतीक्षा सातवा वेतन आयोग सन २०१६ मध्ये लागू झाला. तद्नंतर ह्याचा सन २०२९ पासून पाच हप्त्यात वेतनाच्या फरकाची रक्कम जीपीएफ खात्यात जमा करावी, असे आदेश शासनाने दिले होते. मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे हे हप्ते रखडलेच होते. तर डीसीपीएस, एनपीएसच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. आता सात वर्ष लोटली तरीसुद्धा सातव्या वेतन आयोगाचा एकही हप्ता जीपीएफधारक शिक्षकांना मिळाला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.