आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे:दालनाला चपलांचा हार; पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला चपलांचा हार घातला होता. या प्रकरणात मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारिवरुन शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

पालिकेमध्ये मुदतवाढ देण्यात आलेल्या कचरा कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतन अदा न केल्याने कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची कामे बंद केली आहे. इतकेच नव्हे तर मागील काही महिन्यात शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याचा आरोप करीत यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीकडून पालिका मुख्याधिकारी यांच्या दालनाला चपलांचा हार लावुन शुक्रवार दि. १६ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. मात्र मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी या प्रकरणात शनिवार दि. १७ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात ते जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी होते.

असे असताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मला फोन करुन कार्यालयात आहे का असे विचारले. त्यावर मी अतिक्रमण मोहिमेत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी अचानक पालिका कार्यालयात अनधिकृत प्रवेश करुन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला चपलांचा हार घालुन मुख्याधिकारी डोल्हारकर मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे काँग्रेसचे चंद्रशेखर चौधरी, जावेद अंसारी, अनील देशमुख, वैशाली सवाई, विशाल पावडे, घनश्याम अत्रे, उमेश इंगळे, अजय किन्हीकर, बबली भाई, अरुण ठाकूर, अनिल चवरे व इतर कार्यकर्ते यांच्यावर विविध कलमान्वये कारवाई करण्याची मागणी त्यांनी तक्रारीत केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल केले आहे.

बातम्या आणखी आहेत...