आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीचा निषेध:पाण्यासाठी वीरपांग्रा येथील महिलांचे हंडा आंदोलन

सिंदखेडराजा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विरपांग्रा येथे मागील सतरा दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित आहे. ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनाला वैतागून गावातील महिलांसह पुरुषांनी देखील पाण्याचा हंडा उलटा करत ग्रामपंचायतीचा निषेध केला आहे. पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली न काढल्यास ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

तालुक्यातील विरपांग्रा येथे महाजल योजनेअंतर्गत २६ लाख रुपये खर्च करून, नळयोजना सुरू करण्यात आली आहे. परंतु पाणी पुरवठा यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे गावकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. वीरपांग्रा येथे नियोजन शून्यता आढळते. तसेच स्मशान भूमीची साफ़ सफाई, गावातील विद्युत खांबावर दिवे लावणे आदि समस्याही डोके वर काढत आहेत. गावातील विविध समस्यांबाबत २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामसेवकांनी समस्या तात्काळ सोडवण्यात येतील, असे सांगितले होते. परंतु अद्याप पर्यंत कुठलीच समस्या सोडवण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांसह ग्रामस्थांनी आज उलटे हंडे करून आंदोलन केले. गावातील समस्या न सोडवल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा ॲड. योगेश जायभाये यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...