आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील स्व. रामाजी चन्नावार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ व टीडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने “आजादी का अमृत महोत्सव” निमित्य तथा “हमारा तिरंगा हमारा अभियान” या अभियानाचा परिचय विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा कोलतेवार यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक भारतीयाने या अभियानात सहभागी होऊन आपल्या घरी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज सन्मानाने, आदरपूर्वक ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताचे गायन करून फडकविणे. तसेच या दोन दिवसाच्या कालावधीत राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेत सदर अभियानाचा भाग होण्याचे आवाहन मार्गदर्शकांनी केले. या अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घेणे, हीच आपल्या सर्वांच्या वतीने भारतीय सैन्यातील वीर शहीद जवानांना खरी श्रद्धांजली असेल असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे मार्गदर्शक टीडीआरएफचे जनसंपर्क अधिकारी तथा प्रशिक्षण अधिकारी अभिषेक राजहंस यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.