आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाव तालुक्यात सिंचनाचे अल्प प्रमाण व त्यातच होत असलेली वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा जनतेला बसू लागला आहे. सकाळी ११ वाजल्यानंतर शहरातील रस्ते कर्फ्यू सदृश स्थितीत दिसू लागले आहे. तर काही जन थंडीचा ऊब मिळावा म्हणून शीतपेयाच्या दुकानात मोठी गर्दी करत असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यत पोहचला असून एप्रिल महिन्यात हा पारा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. या चमचमत्या उन्हा मुळे जनता हैराण झाल्याचे दिसत आहे.
महागाव तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र अल्प प्रमाणात आहे. कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र अधिक असल्याने वृक्ष कटाई राजरोसपणे होत असल्याने जंगले भकास होऊन उष्णतेत वाढ होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणा मध्ये नियमित फेरबदल होत असतो. मार्च महिना लागताच उन्हाच्या पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वर चढत आहे. त्यामुळे उन्हाच्या दहाकतेने नागरिक हैराण झाल्याचे दिसून येत आहे.
महागाव तालुक्यात शुक्रवारला महागाव व गुरुवारला फुलसावंगी, हिवरा, काळी दौ येथे आठवडी बाजार भरतो. या बाजारात खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. पण शीतपेयाच्या दुकानात प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागामध्ये भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच रात्रीच्या वेळी कुलर, एसी, पंखे सुरू करावे लागत असल्याने वीज बिल ही भरमसाठ येत आहे. शहराचे वाढते विस्तारिकरणं होत असलेली जंगल तोड सिंचनाचे अल्प प्रमाण त्यामुळे उष्णते मध्ये कमालीची वाढ होत आहे. याचा दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. उष्मघातामुळे थकवा, मळमळ, पोट दुखी या रुग्णांची संख्या अधिक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.