आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्याद:विवाहितेचा 2 लाखासाठी‎ छळ, यावल पोलिसांत‎ गुन्हा दाखल

यावल‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल शहरातील नगिना चौक,‎ खिर्णीपुरा भागातील माहेर‎ असलेल्या २० वर्षीय विवाहितेचा‎ माहेरहून २ लाख रूपये आणावे‎ यासाठी पतीसह ८ जणांनी छळ‎ केला. पैसे न दिल्याने माहेरी सोडून‎ दिले. याप्रकरणी यावल पोलिसांत‎ गुन्हा दाखल झाला आहे.‎ तेहसीन जिया शेख रिजवान यांनी‎ दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह‎ शेख रिजवान शेख सलीम‎ (रा.अयान कॉलनी, भुसावळ)‎ याचेशी ६ मार्च २०२२ रोजी झाला‎ होता.

लग्नानंतर पती शेख रिजवान,‎ सासू नईमाबी शेख सलीम, सासरे‎ शेख सलीम शेख शब्बीर, नणंद‎ नाजीयाबी हकीम काझी, मामेसासरे‎ हाफिज खान हबीब खान, आसिफ‎ खान हबीब खान, सादिक खान‎ हबीब खान, मावससासू नजमाबी‎ शेख नबी ( रा.भुसावळ) या ८‎ जणांनी छळ केला. भुसावळ येथील‎ रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन उघडायची‎ असल्याने माहेरून २ लाख रुपये‎ आणावे अशी मागणी केली. पैसे न‎ दिल्याने त्रास दिला.‎

बातम्या आणखी आहेत...