आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पत्नीचा गळा आवळून, कोयत्याने केले वार ; दुसरीही मुलगी झाल्याचा राग

उमरखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या मुली नंतर दुसरीही मुलगी झाल्याने पत्नीचा गळा आवळून, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न पतीने केला. ही घटना तालुक्यातील पार्डी बंगला या गावी २१ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.शिवाजी अवधूत चव्हाण वय ३८ वर्षे असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याची पत्नी जयश्री हिला दुसरीही मुलगी झाल्याने राग मनात धरून त्याने प्रथम तिचा दोरीने गळा आवळला. यानंतर कोयत्याने वार करुन तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला बघून आरोपी पती शिवाजी याने घाबरलेल्या अवस्थेत थेट पोफाळी पोलिस ठाणे गाठून घडलेली घटना पोलिसांना सांगीतली. घटनेचे गांभीर्य पाहून ठाणेदार राजीव हाके यांनी पोलिस पथकासह घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीला नातेवाइकांनी उपचारासाठी नांदेड येथे पाठविले होते.

लागोपाठ दोन मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरून आरोपी पती शिवाजी काही दिवसापासून नेहमीच जयश्रीला मारहाण करुन मानसिक त्रास द्यायचा. घटनेच्या दिवशी याच कारणावरून वाद करून दोरीने गळा आवळून ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने विरोध केल्यामुळे संतापलेल्या आरोपी पती शिवाजीने कोयत्याने डोक्यावर, मांडीवर वार करून गंभीर जखमी केले. सध्या नांदेड येथे गंभीर जखमी जयश्री वर उपचार सुरू असून तीच्या जबाबावरून आरोपी पती विरुद्ध पोफाळी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...