आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप‎:अणे महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र‎ विभाग प्रमुख प्रा. लता वाघेला यांना निरोप‎

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनायक बापूजी अणे‎ महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.‎ डॉ. लता वाघेला या सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त‎ महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनी तसेच संशोधक‎ विद्यार्थिनींनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते.‎ प्रा. वाघेला या ३३ वर्षांपासून विद्यादानाचे काम करत‎ होत्या.

अमरावती विद्यापीठात गृह अर्थशास्त्र‎ विभागाच्या बोर्ड ऑफ स्टडीच्या सदस्य होत्या.‎ अभ्यासक्रमावर आधारित त्यांचे पुस्तक प्रकाशित‎ आहे. निरोप समारंभाच्या वेळी प्रा. रूपाली कणसे,‎ प्रा. वैशाली कांबळे, सरला पिंपरवार, प्रणिता थूल ह्या‎ संशोधक विद्यार्थिनींनी त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी‎ मंगल कामना देऊन आनंददायी सेकंड इनिंग साठी‎ शुभेच्छा व्यक्त केल्या.‎

बातम्या आणखी आहेत...