आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपाल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन:दिग्रस येथे हेल्थ कार्ड शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिग्रस23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवस सामाजिक उपक्रमातून व्हावा या दृष्टीने आरोग्य दूत गोपाल राठोड यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हेल्थ कार्ड शिबिराचे आयोजन गुरुवार, दि. ८ सप्टेंबर रोजी नगर परिषद सुधाकर धुर्वे शाळा क्र. ६ येथे करण्यात आले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत रुग्णांना ५ लाखाच्या आत आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी नेहमी नागरिकांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी धावपळ करणारे दिग्रस शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोपाल राठोड यांनी हेल्थ कार्ड शिबिर आयोजित आपल्या वाढदिवशी करून सामाजिक उपक्रम राबवल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ६० वर्षाखालील नागरिकांचे हेल्थ कार्ड शिबीर घेण्यात आले. शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हेल्थ कार्ड काढून घेतले. या शिबिरात हेल्थ कार्ड शिबिराचे तालुका कॉरडीनेटर उमेश धुर्वे, अमोल आडे, पंकज दुधाट, संतोष भारस्कर यांनी नागरिकांना कार्ड काढून दिले. या शिबिराला जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, डॉ. मनोज टेवरे, मयूर पवार, अजय भोयर, अतुल गाडे आदींनी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...