आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी:संत रविदास महाराज जयंतीनिमित्त‎ रविवारी आरोग्य तपासणी शिबिर‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरु रविदास चर्मकार सेवा संघाच्या‎ वतीने संत शिरोमणी रविदास‎ ‎ महाराजांच्या‎ ‎ जयंतीनिमित्त‎ ‎ मूर्तीची‎ ‎ प्राणप्रतिष्ठा, व‎ ‎ आरोग्य तपासणी‎ ‎ शिबिर रविवार‎ दि. ५ फेब्रुवारी रोजी आयोजित‎ करण्यात आली आहे. स्थानिक‎ संभाजी नगरातील श्री संत रविदास‎ महाराज मंदिर ,रविदास सोसायटी,‎ यवतमाळ येथे सकाळी दहा वाजता‎ जयंती कार्यक्रमाला सुरुवात होईल.‎ यात प्रमुख वक्ते शालिग्राम वाडे‎ (बुलढाणा) सेवानिवृत्त‎ मुख्याध्यापक व कवी यांचे मार्गदर्शन‎ होईल. संघटनेचे अध्यक्ष एल. आर.‎ वानखडे अध्यक्षस्थानी राहतील.‎

प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. संदीप‎ पाटील (दारव्हा) उपस्थित राहणार‎ आहेत.यानिमित्त चर्मकार समाज‎ बांधवांसाठी मोफत आरोग्य‎ तपासणी शिबिर आयोजित केले‎ आहे.‎ याप्रसंगी वैद्यकीय तपासणी‎ करिता डॉ. किरण खंडारे एम एस‎ सर्जरी (आयुर्वेद), डॉ. प्रज्ञा किरण‎ खंडारे एमडी (आयुर्वेद), डॉ.‎ रवीशेखर पाटील एमबीबीएस, एमडी‎ (बालरोग तज्ञ), डॉ. वरूण डहाके‎ एमबीबीएस (अस्थिरोग तज्ञ) व डॉ.‎ हरीष तांबेकर एमबीबीएस, एमडी,‎ पीडियाट्रिक्स, एफआयएपी‎ नियोनटोलॉजी आपली सेवा देणार‎ आहेत. या कार्यक्रमात सहभागी‎ होण्याची विनंती गुरु रविदास‎ चर्मकार सेवा संघ यांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...