आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संततधार पावसमुळे:पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी

मारेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संततधार पावसाने नदीला आलेल्या पुरामुळे नदी परिसरातील गावात चिखलाचे साम्राज्य पसरले असून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात येताच माजी जि. प. सदस्य अरुणा खंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोसारा या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गावातील परिसरातील शेकडो लाभार्थ्यांनी मोफत तपासणी करून उपचार घेतले.

संततधार पावासामुळे बेंबळा प्रकल्पा सह अप्पर वर्धा प्रकल्पा मध्ये पाणी साठा वाढल्याने दोन्ही प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे वर्धा नदीला महापूर आला होता. गावा गावात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे आरोग्याचा प्रश्न येरणीवर आल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अरुणा खंडाळकर यांनी स्वखर्चातून आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून औषध वाटप केले. आरोग्य तपासणीसाठी डॉ. अक्षय खंडाळकर यांच्या टीमने या उपक्रमात परिश्रम घेतले. येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात हे एक दिवशीय शिबीर घेण्यात आले होते. येथील सरपंच पांडुरंग नन्नावरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडलेल्या या शिवाराचा कोसारावासीयांनी लाभ घेतला.

बातम्या आणखी आहेत...