आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य अधिकाऱ्यांचे पत्र:पाणी नमुने तपासणीसाठी‎ आरोग्य सेवकांना सक्ती नको‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी नमूणे, टीसीएल नमुने‎ तपासणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना‎ सक्ती करू नये, अशी मागणी‎ राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी‎ संघटनेच्या वतीने करण्यात आली‎ होती. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य‎ अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी‎ पत्र काढून अशा स्वरूपाची सक्ती‎ करू, असे निर्देश तालुका आरोग्य‎ अधिकाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य‎ केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले‎ आहे.

याची प्रभावी अंमलबजावणी‎ केल्या जाईल की नाही, असा प्रश्न‎ सद्या उपस्थित झाला आहे.‎ जिल्ह्यात मोठ्या संख्येने पाण्याचे‎ स्त्रोत आहे. या स्रोतांची मान्सूनपूर्व‎ आणि मान्सून नंतर तपासणी करणे‎ गरजेचे आहे. यात प्रामुख्याने पाणी‎ नमूणे, टीसीएल नमुने तपासणीच्या‎ दृष्टीने संकलित करण्याची‎ जबाबदारी जल सुरक्षा रक्षकांची‎ आहे. मात्र, पाणी नमुने‎ तपासणीसाठी प्रयोगशाळेत‎ आणण्याची सक्ती आरोग्य‎ सेवकांना केल्या जात होती.

या‎ प्रकारामुळे आरोग्य सेवकांमध्ये‎ संतापाची लाट निर्माण झाली होती.‎ दरम्यान, वारंवार संघटनेच्या‎ माध्यमातून निवेदन दिल्यानंतरही‎ गांभीर्याने घेतल्या जात नव्हते.‎ अशात राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी‎ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा‎ आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद‎ चव्हाण यांना निवेदन दिले होते.‎ याची दखल जिल्हा आरोग्य‎ अधिकाऱ्यांनी घेत आरोग्य‎ सेवकांना पाणी नमुन्यांसाठी सक्ती‎ करू नये, असे आदेश तालुका‎ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह प्राथमिक‎ आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय‎ अधिकाऱ्यांना दिले आहे.‎ याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित‎ करण्यात आले आहे. असे असले‎ तरी ह्या आदेशाची प्रभावी‎ अंमलबजावणी केल्या जाईल की,‎ नाही असा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...