आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. दरम्यान, वातावरणातील बदलाबाबत जागृती निर्माण करणे, आरोग्य संस्था वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे, त्यासाठी आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात येत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर तसेच विविध आजारांच्या प्रमाणावर होत आहे. या विषयाचे महत्व लक्षात घेऊनच २०२०-२१ पासून राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम आरोग्य अभियानांमध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे.
वातावरणातील बदलाला संवेदनशील असणाऱ्या आजारांना समर्थपणे तोंड देता यावे, यासाठी सर्व नागरिक आणि विशेषतः लहान मुले, स्त्रिया, वृध्द, आदिवासी आणि परिघावरील जनसमूहासाठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत तात्काळ उपचार होणे गरजेचे आहे. या साठी जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहेत. चक्कर येणे सुस्त वाटणे, त्वचा लालसर होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाचे ठोके वाढणे आदी उष्माघाताचे लक्षणे आहे. कार्यशाळेत उपस्थित आरोग्य अधिकारी व अन्य मान्यवर.
कार्यशाळेत आरोग्य अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली.या कार्यशाळेत वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.सचिन दिवेकर,डॉ.&nbs p;विजय डोंपले यांनी पॉवर पॉइंटद्वारे सादरीकरण केले.तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस .चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आर.डी.रा ठोड यांनी मार्गदर्शन केले.या कार्यशाळेला मधुकर मडावी,डॉ. ;शाहु,डॉ. ;स्मिता पेटकर,डॉ. ;निलेश लीचडे,तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यक ीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.