आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरे येरे पावसा:पावसाची दडी, बळीराजा संकटात; मारेगाव तालुक्यात दुबार पेरणीचे संकट, आता जोरदार पावसाची प्रतीक्षा

मारेगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मारेगाव तालुक्यात जवळपास अंशी टक्के शेतकऱ्यांच्या खोबणी पूर्ण झाली आहे. दरम्यान काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊसही पडला. त्यामुळे अंकुरित झालेले बियाणे कडक उन्हामुळे खराब होत असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. रोहिणी नक्षत्रात काही शेतकऱ्यांनी नेहमी प्रमाणे धूळ पेरणी केली. त्यानंतर मृग नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर शेकडो शेतकऱ्यांनीही पेरणी केली. दरम्यान काही ठिकाणी मान्सून पूर्व तुरळक पाऊस आला. त्यामुळे जमिनीत टाकलेले बियाणे खराब होऊन दुबार पेरणीचे संकट आले आहे. तर काही भागात पाण्याचा थांग पता नसल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे.

दरवर्षी शेतकरी राज एकच विचार करून शेतात पेरणी करतो की या वर्षी चांगले उत्पन्न होईल आणि देणे करांचे देणे होईल. परंतू असे होत नाही. दरवर्षी अनेक संकटाचा सामना करता करता बळीराजा मेटाकुटीस आला आहे. मागील वर्षी कापसाला भाव बरा होता. परंतू बोंड अळीमुळे उत्पन्नात घट झाली परिणामतः भाव जास्त असला तरी उत्पन्न जास्त घेता आले नाही. यावर्षी तर फार वाईट अवस्था आहे. रोहिणी नक्षत्र गेले, मृग नक्षत्र ही रिकामे जात आहे. मात्र कुठेच पाण्याचा पत्ता नाही. शेतकऱ्यांनी शेकडो स्वप्न उराशी घेऊन पेरणी केली. मात्र ही पेरणी आता धोक्यात आली आली आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस आला. त्या ठिकाणी बीज अंकुरित झाले आहे. ज्यांच्याकडे स्पिंकलरची सोय आहे. त्यांनी पिक वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. भर पावसाळ्याच्या मोसमात अंकुरित झालेले पिक कोमेजून जाऊ नये, या साठी पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. आता शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

खरीप हंगाम लांबणीवर, कापसाचा पेरा दहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
मृग नक्षत्र म्हटले की, बळीराजासाठी जणू पर्वणीच असते. या नक्षत्रात पावसाला सुरुवात होते. परंतू यावर्षी पावसाचा पत्ता नाही खरीप हंगामाला बळीराजा सज्ज आहे. चातका प्रमाणे आभाळाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र पेरणी योग्य पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्व पेरण्या खोळंबल्या असून, लांबणीवर गेल्या आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे. फुल सावंगी परिसराची सर्वदूर हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पावसाला लवकर सुरवात होणार म्हणून बळीराजाने झटपट पूर्व मशागत करून शेती फोडून, पेरणी योग्य तयार केले. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी बी -बियाणे, बिजाई, खते घेवून अगदी पेरणीची तयारी केली आहे. मागील वर्षी वेळे वर पावसाने हजेरी लावल्याने पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

पीक पण चांगले आले होते. मागच्या वर्षीचा कित्ता याही वर्षी गिरवल्या जाईल, अशी अपेक्षा असतांना पावसाने शेतकऱ्यांना चांगलीच हुलकावणी दिली. शासनाने व हवामान विभागाने सुद्धा चांगले पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असे सांगितले आहे. मागील काही वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे. तर मागच्या कापसाला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत असून एका अंदाजा प्रमाणे यावर्षी १० टक्क्याने कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...