आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना दिलासा:दिग्रस तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मिळाली संजीवनी

दिग्रस23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्यात दि. ४ सप्टेंबरला रात्री ३ वाजता सुमारास मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्याच्या पिकांना संजीवनी मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. रात्री ३ वाजता पासून सुरू असलेल्या पावसाने दिवशीही उसंती न घेतल्याने दिवसभर रिमझिम पावसाची हजेरी सुरूच होती.रात्री आलेल्या विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. वातावरणात प्रचंड गर्मी निर्माण झाली होती. नागरिक उकड्यामुळे त्रस्त झाले होते. अचानक काल मध्यरात्री आलेल्या दमदार पावसाने वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी याआधी पेरणी केली.

परंतु पावसाच्या अभावी पिकांची उगवण झाली नाही. तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली असता पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अशातच काही राहिलेले पीक पावसाने दडी मारल्याने सुकत चालले होते. दि.१५ ऑगस्ट दरम्यान रिमझिम पाऊस आला. तद्नंतर पावसात खंड पडला. तेव्हा दि.३० ऑगस्ट रोजी आलेल्या पावसाने थोडा फार दिलासा मिळाला. लगेच ५ दिवसांनी म्हणजे दि. ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आलेल्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकांना नवी संजविनी मिळाल्याने शेतकरीवर्गात आनंद व्यक्त होत आहे. कापूस, सोयाबीन पीक जास्त प्रमाणात लागवड असल्याने पावसाची गरज होती ती पूर्ण झाली आहे. या आधी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे पीक जमिनिसह खरडून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अनेक निवेदने शासनाला देण्यात आली परंतु शेतकऱ्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...