आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:तीन महसुली मंडळात अतिवृष्टी

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सोमवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यसातील तीन महसुली मंडळात अतिवृष्टी झाली असून, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत दीडशेहून अधिक मंडळातील जवळपास चार लाख हेक्टरवरील पिके क्षतिग्रस्त झाली आहे. ह्यात आता आणखी तीन महसुली मंडळाची भर पडली आहे.

जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, सरासरीच्या तुलनेत ८८०.९ मी मी पावसाची नोंद चक्क ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली आहे. छोटे, मोठे सर्वच धरण, प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, नदी, नाल्यासुद्धा ओसंडून वाहत आहे. असे असताना जून आणि जुलै महिन्यात तीन लाख हेक्टर आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातला कोसळलेल्या पावसामुळे एक लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अधून मधून येणाऱ्या पावसाने मागिल काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. मात्र, सोमवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आकाशात ढगांनी एकच गर्दी केली होती. तर रात्री साडेसात वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे तारांबळ उडाली होती.

मंगळवारी सर्वत्र ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता
मागिल काही दिवसांपासून अधून मधून रिमझिम पाऊस हजेरी लावत होता. मात्र, जोरदार पाऊस कोसळला नव्हता. शेती पिकासाठी पाऊस अत्यावश्यक होता. अशात सोमवारी काही तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. तर मंगळवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सर्वत्र ढगाळी वातावरण होते. कुठेही पाऊस झाला नाही, परंतू गणेशाच्या आगमनापूर्वी पाऊस कोसळण्याची शक्यता स्पष्ट दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...