आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरग्रस्तांना मदत:सत्चिकित्सा मंडळातर्फे पूरग्रस्तांना मदत

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानव सेवा हीच माधव सेवा ही भगवान श्रीसत्यसाई बाबाची शिकवण घेऊन लोककल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या यवतमाळ येथील सत्चिकित्सा प्रसारक मंडळाद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येते. विद्यार्थ्यांचा शारीरीक, बौद्धिक, क्रियात्मक विकास करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेचे संस्कारमूल्य रुजवण्यासाठी सत्चिकित्सा प्रसारक मंडळाच्या डॉ. नंदुरकर विद्यालय, सत्यसाई इंग्लिश मिडीयम स्कुल या शाळेमार्फत विविध उपक्रम घेतले जातात. लहानापासून तर थोरांपर्यंत साथी हात बढाना या सुभाषिताप्रमाणे प्रत्येकाचे एक हात मदतीचा या अंतर्गत सहकार्य लागले. आणि दोन्ही शाळेच्या एक हजार विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एक लाख रूपये निधी गोळा केला. यासोबतच काही माता पालकांनी शंभर साड्या पूरग्रस्तांसाठी पाठवल्या.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली. संपूर्ण राज्यातून या जिल्ह्यात मानव सेवेची रीघ लागली. मग संस्थेला देखील वाटलं की, या समाजकार्यात आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा हातभार लागला पाहिजे, त्यांना देखील आपादग्रस्तांचे आशीर्वाद मिळाले पाहिजे. संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या डॉ. नंदुरकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती बावीसकर, मुख्याध्यापिका शितल तिखिले ह्यांनी अतिषय नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रेरित करून मानव सेवेसाठी देणगी गोळा केली आणि पाहता पाहता चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरातील घरोघरी जाउन पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला.

यातून शिक्षक, विद्यार्थी व पालकांची समाजसेवेप्रती असलेली दृढ निष्ठा दिसून आली. पूरग्रस्तांना एक हात मदतीचा यामार्फत पूरग्रस्तांना गोळा झालेल्या निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्डाडे यांनी मदतीला शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...