आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाम फाउंडेशनकडून महिलांना मदत; महागाव तालुक्यातील 22 कुटुंबाना 25 हजारांची मदत

महागाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने महागाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २२ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली. गुणवंतराव देशमुख संकुल येथे गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सावन कुमार, तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण, अॅड. आशिष देशमुख, संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख उपस्थित होते. महागाव तालुक्यातील सुनीता काचगुंडे, छाया नजरधने, सोनाली टेमकर, माहेश्वरी चव्हाण, कलावती ठाकरे, शोभा पवार, योगिता भारती, सुभीबाई राठोड, अनिता नरवाडे, सुनिता जंगले, सागरी पवार, रेशमा पवार, सुनिता राठोड, वर्षा भरकड, अर्चना गावंडे, गया आढागळे, कुसुम मेंढे, लक्ष्मी फाळके, सयाबाई वानखेडे, गोदावरी राठोड, सारिका उबाळे, उर्मिला कदम या २२ महिलांना धनादेश देण्यात आले. महागाव तालुक्यात एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत महिलांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश धर्माळे, प्रास्ताविक स्वप्नील देशमुख तर आभार डॉ. संदीप शिंदे यांनी मानले. यशस्वितेसाठी विदर्भ समन्वयक हरीश इथापे, जिल्हा समन्वयक नितीन पवार, पुसद समन्वयक स्वनील देशमुख, महागाव समन्वयक प्रल्हाद कदम, गजानन पवार, उमरखेड समन्वयक दीपक ठाकरे, दिग्रस समन्वयक रवींद्र राऊत, दारव्हा समन्वयक देवेंद्र राऊत तसेच धनंजय देशमुख, यशवंत देशमुख, किरण देशमुख, मोंटू देशमुख, अमोल उबाळे, हरगोविंद कदम, डॉ. संदीप शिंदे या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...