आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:खोट्या तक्रारी करून विकास कामांमध्ये आणला अडथळा; पंचायतचे बांधकाम सभापती गजानन साबळे

महागावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासन नियमाप्रमाणे होणाऱ्या शहरातील विकास कामांच्या खोट्या तक्रारी करून कामांमध्ये अडथळा आणण्याचे काम विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडून केल्या जात असल्याचा आरोप नगर पंचायतचे बांधकाम सभापती गजानन साबळे यांनी केला आहे.

महागाव शहरात प्रभाग क्रमांक एकमध्ये रस्ता, नालीचे बांधकाम करणे ९ लाख ९४ हजार रूपये, प्रभाग क्रमांक दोनमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे सहा लाख ५६ हजार रूपये, प्रभाग क्रमांक ७ मध्ये दलितेत्तर वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रोड, नाली बांधकाम करणे आठ लाख २१ हजार रूपये, प्रभाग क्रमांक आठमध्ये नाली बांधकाम करणे ३ लाख ७८ हजार रूपये, असे एकुण २८ लाख ४९ हजार रूपये किंमतीचे विकास कामे करण्यात येणार आहे. या कामांच्या निविदा शासन नियमांप्रमाणे काढण्यात आल्या असून, सर्व काम शासन नियमाप्रमाणे करण्यात येत आहे. सत्तास्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यात जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची विकास कामे मंजुर केली.

विरोधकांकडून जनतेसह प्रशासनाची दिशाभुल
निविदा प्रक्रिया ही पारदर्शक, शासन नियमांप्रमाणे राबवण्यात आलेली आहे. या निविदा मॅनेज करण्यासाठीच नगरसेवक कम अनधिकृत ठेकेदार असलेल्या नगरसेवकाने संबंधित कर्मचाऱ्यांवर दबाव टाकुन भांडण केले होते. याचे नगर पंचायतीच्या सीसीटीव्हीमध्ये व्हिडीओ फुटेज सुद्धा आढळले. या ठेकेदार नगरसेवकाचा मनसुबा धुळीस मिळाल्यानेच त्याचा राग धरून विरोधकांकडून खोट्या तक्रारी करून जनतेसह प्रशासनाची दिशाभुल केली जात आहे.
सुजितसिंह ठाकुर, नगरसेवक, नगर पंचायत.

बातम्या आणखी आहेत...