आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिराचंद मुनोत मेमोरियल क्रिटिकेअर हॉस्पिटल हे यवतमाळ जिल्ह्यातील एकमात्र १०० बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. २५ बेडचे प्रशस्त आयसीसीयु, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, न्युरोलॉजी, न्युरो व स्पाइन सर्जरी, युरोलॉजी, कार्डीओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी या सारख्या सुपर स्पेशालिटी सेवा, सुसज्ज अद्यावत उपकरणे हे या हॉस्पिटलचे वैशिष्ट आहे.
दिल्लीतील ‘नॅशनल अॅक्रिडेटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटलच्या’ वतीने देण्यात येणारे ‘एन.ए.बी.एच’ मानांकन यवतमाळ येथिल हिराचंद मुनोत मेमोरियल क्रिटिकेअर हॉस्पिटलला प्राप्त झाले आहे. एनएबीएच’ च्या अधिस्वीकृतीमुळे हॉस्पिटलकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह रुग्ण सेवेवर शिक्कामोर्तब झाले आहे. अद्ययावत उपचारांची सुविधा हा ‘एनएबीएच’ मानांकनासाठीचा अत्यंत महत्त्वाचा निकष आहे. हिराचंद मुनोत मेमोरियल क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप कारिया यांनी ‘एन.ए.बी.एच’ च्या अधिस्वीकृतीमुळे हॉस्पिटलच्या विश्वासार्हतेत अधिक वाढ होईल व त्याचा फायदा रुग्णांनाच होईल व ‘एनएबीएच’च्या मान्यतेमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिकच वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त केला. वैद्यकिय अधीक्षक डॉ. दिलीप देशमुख यांनी सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाचे हे यश असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. एन.ए.बी.एच च्या कार्यपद्धतीची माहिती देतांना रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा मिळवून देणे, रुग्णाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आरोग्य मानकांचा लाभ रुग्णांना मिळवून देणे यासाठी “रुग्णालये व आरोग्यसेवेसाठीचे राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ’ (एन.ए.बी.एच) कार्यरत असल्याचे सांगितले.
रुग्णालयातर्फे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, सेवा, उपचार या सर्व बाबी लक्षात घेऊनच अशा प्रकारची मान्यता ‘एन.ए.बी.एच’ कडून दिली जाते. ‘एन.ए.बी.एच’ ची अधिस्वीकृती मिळवण्याच्या प्रक्रियेत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप कारिया, संचालक डॉ. बी.डी. वाघ, डॉ. टी.सी. राठोड, डॉ. विजय ठाकरे, डॉ. अजित फडके, डॉ. दिपक अग्रवाल, डॉ. एन. के. पुराणीक, डॉ. आशिष तावडे, डॉ. सचिन बेले, डॉ. हर्षल राठोड, डॉ. चेतन राठोड, डॉ. अक्षय फडके, डॉ. वेदांत लाखे तसेच मुख्यलेखा अधीकारी आनंद पसारी व एच. आर. कल्याणी राजा यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.