आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाईक महाविद्यालय क्रीडा संकुलात अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ उत्साहात पार पडल्या.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची ऐतिहासिक कामगिरी असे प्रतिपादन अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले.बक्षिस वितरण व समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदिवासी विकास, अमरावतीचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे होते.
तर पुसद नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, आदिवासी विकास,अमरावतीचे सहाय्यक आयुक्त (शिक्षण) शिवानंद पेढेकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे, कळमनुरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डीन डॉ. दिनकर बाजड उपस्थित होते. फुलसिंग नाईक महाविद्यालय प्रबंधक उमेश चव्हाण, अपर आयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी व सर्व सातही प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंचावर उपस्थित होते. १ ते ३ फेब्रुवारी या कालावधीत पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आदिवासी विकास, अमरावती अंतर्गत ७ आदिवासी विकास प्रकल्पातील एकुण दोन हजार ४८४ विद्यार्थी सहभागी झाले. १४, १७ व १९ वर्षे वयोगट मुला-मुलींचे एकुण ११८ रनींग, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, नेमबाजी, उंचऊडी, लांबऊडी ई. वैयक्तिक व ७२ कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हैंडबॉल ई. सांघिक क्रीडा प्रकार खेळवल्या गेले.
समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर विभागीय क्रीडा स्पर्धेत विजयी खेळाडू उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना बक्षिस वितरीत प्रमुख अतिथी डॉ. दिनकर बाजड यांनी ७ रंगाच्या ध्वजाखाली ७ प्रकल्पातील खेळाडु व त्यांचे क्रीडाशिक्षक ज्यावेळी क्रीडांगणात आपले क्रीडा गुणांचे प्रदर्शन करीत असले तरी ते एकाच कुटुंबांचे सदस्य असल्याचे जाणवत होत असे आपले छोटेखानी भाषणात प्रतिपादन केले. बक्षिस वितरण कार्यक्रमात यशस्वी स्पर्धकांचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना ३५४ मेडल्स व ७२ ट्रॉफीजचे वितरीत करून सन्मानित करण्यात आले.
विभागीय स्तरावर यशस्वी झालेले हे सर्व खेळाडू राज्यस्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतला आढावा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसदचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आढावा घेतला. पुसद प्रकल्पाची स्थापना झाल्यापासून १० वर्षांत आपले कार्यकाळात पुसद प्रकल्पाला प्रथमच विभागीय स्पर्धांचे यजमानपद मिळाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्फत पाठविण्यात आलेल्या ४० पंचांनी अतिशय निष्पक्षपणे सदर स्पर्धाचे निकाल दिल्यामुळे कोणत्याही हरकतीविना हे सामने पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
क्रीडा ध्वज उतरवण्यात आला. सन २०२३ - २४ चे अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धाचे आयोजनाकरीता क्रीडाध्वन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे यांचेकडे सन्मानपूर्वक हस्तांतरित करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन आदिवासी आश्रमशाळा, चिरोडी येथील मुख्याध्यापक जवाहर गाढवे व आदिवासी आश्रमशाळा, वसंतपूरचे प्रा. नारायण राऊत यांनी संयुक्तपणे केले. अकोल्याचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे यांनी अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांचे विशेष आभार व्यक्त करीत या स्पर्धांकरीता क्रीडांगण उपलब्ध करुन दिल्याबद्दल फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रबंधक तसेच सर्व उपस्थितांचे, कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या समिती अध्यक्ष व सदस्यांचे आभार व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.