आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोळा सण साजरा:श्रीरामपूर येथे पोळा उत्साहात

पुसद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळच असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे. पोळा हा सण दिवसेंदिवस लोक पावत चाललेला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊनच श्रीरामपूर ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांचा पोळा सण साजरा करण्याचे ठरविले‌. श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामपंचायतीने बैल जोडी, सजावट, बैलजोडी ठेवणे, शरीर बांधा, अशा प्रकारची स्पर्धा घेऊन ग्रामीण जनतेमध्ये एक चांगले उदाहरण दिले.

याकरिता श्रीरामपूर ग्रामपंचायतीने प्रोत्साहनपर प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक व भाग घेणाऱ्यां प्रत्येक बैल जोड्यांना पाचशे रुपये देण्यात आले. यावेळेस विशेष म्हणजे सहभागी बैल जोडी मालक व सांभाळणाऱ्यांना मानाचा फेटा बांधून त्यांचे अभिनंदन केले. यावेळेस उपस्थितांमध्ये माजी जि. प. उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले. गावचे सरपंच आशिष काळबांडे यांनी या ठिकाणी सर्वच लोकांचे आभार मानले. विशेष म्हणजे वसंत नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचणकर,पिंपळगाव सूत गिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगावकर, माजी सरपंच मिलिंद उदयपूरकर, सदस्य विजय राठोड, दिनेश राठोड, राहुल सहारे, परेश पांगारकर, मधुकर कलिंदर, वीरेंद्र इंगोले, सचिव अनिल भगत तंटामुक्ती अध्यक्ष विजय वाडते उपस्थित होते. पोळ्याचे प्रमोद कदम, गोविंदराव कदम व अन्य गावकरी मंडळी आयोजकांनी सहभाग घेतला होता.पोळ्याचे औचित्य साधून बळीराजांचे मनोधैर्य वाढवण्याकरिता शपथ सुध्दा घेण्यात आली. प्रा. नरेंद्र जाधव, गणेश धर्माळे यांनी सर्व गावकरी लोकांना शपथ घेण्यास लावले.

बातम्या आणखी आहेत...