आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकाग्रता, आत्मविश्वास, चपळता वाढवणारा असा हॉकीचा खेळ आहे. आपल्या यवतमाळचे अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकले आहेत. यवतमाळ डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशनचे जे प्रयत्न करत आहे, योग्य प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे निश्चीतच उद्याचे उत्कृष्ट हॉकीपटू निघतील असा विश्वास विनायक दाते यांनी व्यक्त केला. ते दाते क्रीडांगणावर गेल्या चार दिवस संपन्न झालेल्या यवतमाळ हॉकीच्या लीगच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. विशुद्ध संस्था नेहमी हॉकी असोसिएशन च्या पाठीशी राहील अशी त्यांनी काही दिली. यावेळी यवतमाळ डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्ष मीरा फडणीस यांचा विनायक दाते व मान्यवरांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
मीरा फडणीस म्हणाल्या की, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आगे कूच करत आहेत क्रीडा क्षेत्रात ही विद्यार्थिनींनी दिवसेंदिवस परिश्रम करून चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले. हॉकी लीगच्या आयोजक मनीषा आखरे यांनी प्रास्ताविकाद्वारे भूमिका विशद केली. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र शिरसागर, मनोज पांडे, विजय कोरिया, पल्लवी केदारे, भाजपा उपाध्यक्ष कीर्ती राऊत, फ्लोरासिंग, जितेंद्र पाखरे, सपना आवटे, सचिन आवटे, विनोद दोंदल, संजय कोल्हे, अभिजीत पवार, राहुल वंजारी, ओंकार करंदीकर, आयोजक मनीषा आकरे, अतिक शेख विराजमान होते.
दाते हॉकी अकॅडमीचा संघ विजयी या लीगमध्ये १५ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात बाबाजी दाते हॉकी अकॅडमीचा संघ विजयी झाला. स्कूल ऑफ स्कॉलर्स द्वितीय तर अँग्लो हिंदी हायस्कूल तृतीय क्रमांक वर राहिला. १५ वर्षाखालील मुलींच्या गटात राणी लक्ष्मीबाई प्रथम, यवतमाळ पब्लिक स्कूल द्वितीय व स्कूल ऑफ स्कॉलर तृतीय क्रमांकावर विजेता ठरला. १८ वर्षाखालील मुलांच्या गटात यवतमाळ पब्लिक स्कूल विजेता तर स्कूल ऑफ स्कॉलर्स उपविजेता ठरला. १८ वर्षाखालील मुलींच्या संघात राणी लक्ष्मीबाई विद्यालय विजेता व अमोलकचंद विद्यालय उपविजेता ठरला. मुलांच्या वरिष्ठ गटात शहीद भगतसिंग विजेता व बाबाजी दाते हॉकी अकॅडमी उपविजेता ठरली. मुलींच्या वरिष्ठ गटात अमोलकचंद महाविद्यालय प्रथम व यवतमाळ डिस्ट्रिक्ट वुमन्स स्पोर्ट्स क्लब द्वितीय स्थानावर विजेता ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.