आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:तब्बल 33 हजार नागरिकांना करणार होम क्वॉरंटाइन, हातावर शिक्के; परिसर प्रतिबंधित 

यवतमाळ3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांच्या संपर्कातील इतर नागरिकांचा शोध घेण्यात येतोय

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या ८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्ती राहत असलेल्या परिसरासह जवळचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून या भागातील ८ हजार घरांमधील ३३ हजार नागरिकांना त्यांच्याच राहत्या घरात क्वॉरंटाइन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दिले आहेत. 

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांच्या संपर्कातील इतर नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ४ उत्तर प्रदेशचे, २ पश्चिम बंगालचे आणि १ दिल्लीचा असे ७ जण दुसऱ्या राज्याचे रहिवासी आहेत. तर उर्वरित एक जण यवतमाळ येथील असून, तो या ७ जणांच्या संपर्कात आला होता. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेले ८ जण  गेल्या काही दिवसांपासून ज्या परिसरात राहत होते त्या परिसरासह आजूबाजूचा प्रभाग क्रमांक १० व २० मधील तीन किमी परीघ क्षेत्रातील संपूर्ण परिसर ‘शटडाऊन’ करण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांच्या हालचालींवर प्रशासनाची करडी नजर राहणार असून, त्यांच्या फिरण्यावर आणि इतरांशी संपर्क साधण्यावर पूर्णत: निर्बंध टाकले आहेत. मात्र, आता आणखी खबरदारी म्हणून या परिसरात राहणाऱ्या तब्बल ३३ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना होम क्वाॅरंटाइन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दिले आहेत. त्यासोबतच आरोग्य विभाग चमूच्या माध्यमातून दररोज या प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...