आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वितरण‎ सोहळा:उत्तम मनवर केंद्रभूषण पुरस्काराने सन्मानित‎

दिग्रस‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाख येथे जि. प. उच्च प्राथमिक‎ शाळेत आरंभी व तुपटाकळी या दोन‎ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण‎ परिषद घेण्यात आली. या निमित्ताने‎ केंद्रात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या‎ शिक्षकांना केंद्रभूषण पुरस्कार वितरण‎ सोहळा व शिक्षणाधिकारी प्रमोद‎ सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत‎ सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ तथा‎ स्टुडंट ऑफ दी इयर कार्यक्रम‎ आयोजित केला होता.‎ याप्रसंगी जि. प. प्राथमिक शाळा,‎ फुलवाडी येथील महाराष्ट्ररत्न,‎ धम्मभूषण, आदर्श शिक्षक, हरितदूत‎ पुरस्कार प्राप्त शिक्षक उत्तम‎ केशवराव मनवर यांना आरंभी‎ केंद्रभूषण पुरस्काराने जिल्हा परिषद‎ शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी,‎ डायट प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे,‎ गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ज्येष्ठ विस्तार अधिकारी तथा शालेय‎ पोषण आहार अधीक्षिका शुभदा‎ पाटील, केंद्रप्रमुख किरण बारशे व‎ हेमंत दळवी यांना सन्मानित केले.‎ यवतमाळ येथील उपमुख्याधिकारी‎ प्रशांत थोरात यांनी सुद्धा उत्तम मनवर‎ यांना महाराष्ट्ररत्न व धम्मभूषण‎ पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.‎ पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल आरंभी व‎ तुपटाकळी केंद्रातील शिक्षकांनी व‎ अधिकाऱ्यांनी उत्तम मनवर यांचे‎ कौतुक केले. एका धडपड्या‎ शिक्षकाला केंद्रभूषण पुरस्कार‎ मिळाल्याने सर्वच स्तरातून‎ अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.‎