आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागरिबांना मदत, निराधारांना आधार, गरजू रुग्णांना रक्तदान, भुकेलेल्यांना अन्नदान, व समाजातील तळागाळात काम करणाऱ्या असे विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करीत राहणाऱ्या गुणवत्ता प्राप्त करून समाजाला आदर्श देणारे विद्यार्थी व निराश्रित गरजू दिव्यांगांना मदत करणारे सामाजिक संघटना यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी म्हणून सोमवार, दि.१३ जून रोजी व्यापारी योगा भवन स्व. वसंतराव नाईक चौक पुसद येथे सत्कार सोहळा समाजसेवक लल्ला दिंडे मित्र मंडळाच्या वतीने पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजसेवक लल्ला दिंडे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या समस्या व भविष्यात येणाऱ्या अडचणीला मदतीचा शब्द दिला. नुकताच गोव्यात झालेल्या राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर पुसद शहरातून संतोष कांबळे यांचे विद्यार्थी जय उचाडे, राणी राठोड, यश दांडेकर, विकी राठोड, मान्यता देशमुख, नीता पतंगे, द्विजकुमार धाबे, सौरभ भालेराव, प्राची सोनुने, जीत उंटवाल, मिलिंद दांडेकर, ऋषिकेश खंदारे, कुमारे प्राजक्ता गुळवे यांनी सर्वानी सुवर्ण व कांस्य पदक मिळाले आहे. त्यांच्यामुळे पुसदचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. कुस्तीतही मागे न राहता राष्ट्रीय स्तरावर विक्रम गाजवत पुसदच्या विकास शिंदे, उमेश महापुरे, नितीन आडे या खेळाडूंनी सहभाग नोंदवत कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्तरावर पुसदचे नाव झळकाविले. ब्लड लाईन डायरीचे मारोती भस्मे, माणुसकीची भिंतचे गजानन जाधव, राष्ट्रीय दिव्यांग संघ पुसदचे दळवी, जीवन ज्योती एचआयव्ही प्रतिबंध व प्रबोधन संस्था पुसदचे राहुल गायकवाड व सर्व समाजातील तळागाळात काम करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख, कार्यक्रमाचे उद््घाटक पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. मनोज घाडगे, ॲड. भारत जाधव, सुरज डुब्बेवार, शेखर वानखेडे, रवि पद्मावार, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश चन्द्र शुक्ला, वसंत नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचणकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी विवेकानंद अकॅडमी पुसदचे संचालक मुकेश देशमुख उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.