आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृती:महिलांचा सन्मान राखणे ही महाराष्ट्राची संस्कृती : चित्रा वाघ

यवतमाळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांचा सन्मान राखण्याची संस्कृती महाराष्ट्राने बाळगली आहे. मात्र, राज्यात एकट्या महिलेलाच जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. यापूर्वी अनेक महिलांवर विनाकारण शिंतोडे उठवण्यात आले, परंतू त्यांच्याबाबत महा विकास आघाडीच्या सरकारमधून कुठल्याही नेत्याने ब्र सुद्धा काढला नाही, असे मत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.

या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आमदार अॅड. निलय नाईक, डॉ. अशोक ऊईके, संजीवरेड्डी बोदकुरवार,रेखा कोठेकर, डॉ. आरती फुपाटे, राजू पडगिलवार, शंतनू शेटे, शहराध्यक्ष प्रशांत यादव, आकाश धुरट, आदीजण उपस्थित होते.

पूजा चव्हाणच्या प्रश्नावर चित्रा वाघ संतापल्या
महिला अत्याचाराबाबत बोलणाऱ्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी संतप्त होवून प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरूवात केली. त्यांनी दिलेल्या उत्तरावर प्रतिप्रश्न केल्यानंतर त्यांनी चक्क पत्रकारावरच संतापल्याचा खळबळजनक प्रकार पत्रकार परिषदेत घडला. या प्रकारानंतर पत्रकार परिषद आटोपती घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...