आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:आशा; गटप्रवर्तकांचा आज मोर्चा

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य आरोग्य खाते आशा, गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आशा‌ व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या व समस्यांना घेऊन सोमवार, दि. २२ ऑगस्ट रोजी ११ वाजता श्रमशक्ती भवन आयुर्वेदिक दवाखाना येथून मोर्चा निघणार आहे.

आशांना थकीत मानधन चार ते पाच महिने मिळत नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने दि. २२ जुलै रोजी परिपत्रक काढून आशांचा सन २०२१ ते २०२३ मधील थकीत मोबदला अदा करावा, असे आदेश देवून सुध्दा मार्च महिन्या पासुन मानधन थकीत आहे. जिल्ह्यात अद्याप अंमलबजावणी झाली नाही. सतत आशा, गटप्रवर्तक महिलांना उपासमार सोसावी लागत आहे.

वारंवार निवेदन देवून सुध्दा परिस्थीती जैसे थी आहे. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आयटकच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात थकीत प्रोत्साहन भत्ते, मोबदला अदा करावा, प्रोत्साहन भत्ते, मानधन दर महिन्याच्या एक तारखेला द्या, आशा, गटप्रवर्तकांना किमान वेतन २५ हजार रूपये द्या, सामाजीक सुरक्षा लागु करा यांसह इतरही मागण्यांना घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंदना बोंडे, प्रणीता नगराळे, अनामीका कांबळे, सुनिता चव्हाण, आशा बडेराव, रष्मी वाघ, माधुरी पालरवार, कवीता जाधव, वणीता चौधरी, दिपा झोबाळे, किरण कोलवते, विद्या लेंडे, शीला पाटील, लता कलांद्रे, निता सोयाम आदींनी केले.

बातम्या आणखी आहेत...