आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:रुग्णालयात मारहाण; आठ जणांना अटक

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात दोन गटात सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. हा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाल्याने सर्वत्र व्हायरल झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस प्रशासनाने दहा जणांवर गुन्हे दाखल केला आहे. या प्रकरणी बुधवारी दोघांना तर गुरुवारी सहा जणांना अटक करण्यात एलसीबीसह शहर पोलिसांना यश आले.

आशिष उर्फ बगीरा दांडेकर (३३) रा. चमेडीया नगर, धीरज उर्फ ब्रॅन्ड मैंद (२०) रा. वंजारी फैल, विशाल वानखडे (१९) रा. बांगर नगर, स्तवन शहा (२०) रा. विश्वशांती नगर, लोकेश बोरखडे (१९) रा. विसावा कॉलनी, वंश राऊत (२०) रा. बांगर नगर, प्रज्ज्वल मेश्राम (१९) रा. आकृती पार्क, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आठ जणांची नावे आहे. यातील आशिष उर्फ बगीरा दांडेकर आणि धीरज उर्फ ब्रॅन्ड मैंद या दोघांना बुधवारी न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून उर्वरीत सहा जणांना गुरूवारी तीन दिवसाची कोठडी सुनावली.

शहरातील दारव्हा मार्गावर झालेल्या भांडणामध्ये जखमी तरुणाला त्याच्या मित्रांनी मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्याचे दोन साथीदार बाहेर उभे असताना त्या ठिकाणी अचानक आलेल्या आठ ते दहा युवकांनी त्या दोघांवर हल्ला चढविला होता. त्यात दोघांना चाकूने भोसकून ते टोळके पसार झाले होते.

लोहारा ठाण्यातही सात जणांवर गुन्हे
शहरातील दारव्हा मार्गावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणी गौरव ठाकुर वय २७ वर्ष रा. इंदिरा नगर, बाभुळगाव याने लोहारा ठाण्यात तक्रार दिली होती. स्तवन शाह, गोपाल झेंडे, आकाश विरखडे, मनिष बघेल याच्यासह तिघांना विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...