आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखाेंचे‎ नुकसान:पांगरखेड्यात घराला आग ; गाय, म्हैस होरपळून ठार‎

धाड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांगरखेड येथे ५ मार्च रोजी रात्री साडे अकरा‎ वाजेच्या सुमारास अचानक घराला आग लागली, या‎ आगीत घरातील सर्व साहित्य, एक गाय, एक म्हैस‎ आगीत खाक झाली आहेत. या घटनेत घर मालकाचे‎ जवळपास तिन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.‎ रामदास शामराव शिंदे यांचे गावातील झोपडपट्टी‎ भागात टीन पत्र्याचे घर असून घराशेजारीच त्यांचा‎ जनावरांचा गोठा आहे. रामदास शिंदे हे अवकाळी‎ पावसाचे वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे‎ शेजारच्या घरी झोपण्यासाठी कुटुंबासह गेले होते.‎ शिंदे परिवार शेजारी झोपण्यासाठी गेल्यामुळे त्यांना‎ घराला आग लागल्याचे समजले नाही. आग‎ लागल्याचे लक्षात येईपर्यत घर आणि गोठा आगीच्या‎ भक्ष्यस्थानी पडला होता.

या घटनेत त्यांचे लाखाेंचे‎ नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच‎ आज सकाळी तलाठी धनंजय शेवाळे, मंडळ‎ अधिकारी गणेश राऊत यांनी घटनास्थळी धाव घेवुन‎ पंचनामा केला. नुकसान ग्रस्त कुटुंबास शासनाने‎ तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी‎ होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...