आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रदूषण पसरवणारे आणि पीयूसी पासिंग नसलेले वाहन आढळले तर वाहनचालकाला पाचशे रुपयांचा दंड केला जातो. मात्र, एसटी महामंडळाच्या धूर फेकणाऱ्या बसेसकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. एसटी बसेसकडे कागदोपत्री पीयूसी असल्याने कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा वाहनांना पीयूसी मिळतेच कशी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या बसेसची नियमित पीयूसी तपासणी होतेय की नाही, त्यांचे नादुरुस्त भाग वेळच्यावेळी बदलले जातात की नाही याबाबत संबंधित विभागाला माहिती नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या वाढत असल्याचे समोर आले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्येक वाहनांना प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. पीयूसी घेतले नसेल तर त्यांना पोलिस कारवाईत पाचशे रुपयांचा दंड केला जातो.
अधिकाऱ्यांनी गांभीर्यांने लक्ष द्यावे
जिल्ह्यात नागरिकांच्या सार्वजनिक प्रवासाचे लाल परी हीच एक प्रमुख साधन आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेत विश्वासार्ह प्रवासाची खात्री देत असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासाला एसटीला पसंती देतात. परंतू विभागातील बसेस खिळखिळ्या झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.- नीलेश चव्हाण, प्रवाशी.
सर्व बसेसला पीयुसी
पहिल्यांदा नोंदणीनंतर पीयूसीची वैधता सहा महिन्यासाठी असते. एसटीला अधिकृतपणे पीयूसीचे केंद्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वीच तेथेच पीयूसी करून प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे सर्व बसेसला पीयूसी उपलब्ध आहे. - उल्हास वैद्य, यंत्र अभियंता, एसटी महामंडळ
१५० नवीन बसेसची मागणी
विभागातील नऊ आगारातील काही बसेस नादुरूस्त आहे. नविन बसेससाठी शासनस्तरावर प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळ विभागाकडून १५० बसेसचा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर रस्त्यांवरही महामंडळाच्या बस धावू शकतील.- अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.