आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनभिज्ञ:जिल्ह्यात उज्ज्वला गॅसचे लाभार्थी किती ? पुरवठा विभागच अनभिज्ञ

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पाच लाख ७७ हजार ०८१ शिधापत्रिका धारक असून यामध्ये एक लाखावर अंत्योदय म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारक आहेत. या शिधापत्रिकाधारकांपैकी पाच लाख १० हजार सहाशे शिधापत्रिकाधारकांकडेच गॅस जोडणी आहे. जवळपास ६६ हजार शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडणी नाही. त्यातच उज्ज्वला गॅसचे लाभार्थी आहेत. त्यांनी गॅसचे दर वाढल्याने आपले गॅस कनेक्शनच बंद ठेवले आहे. अशा गॅस बंद करणाऱ्यांचे सर्वेक्षण अद्याप गॅस कंपनीने केले नसल्याने पुरवठा विभागालाही उज्ज्वला गॅस किती बंद झाले याची माहिती नाही. जिल्ह्यात उज्ज्वला गॅस बंद झाल्याचा आरोप होत आहे. तर गतवर्षीपेक्षा गॅस वापरणाऱ्यांची संख्या अधिक झाल्याचा दावा पुरवठा विभाग करत आहे.

गतवर्षी जिल्ह्यात पाच लाख ५० हजार शिधापत्रिका धारक होते. यावेळी त्यात वाढ झाली आहे. गतवर्षी एक गॅस असणारे पाच लाख ५ हजार ५५७ लाभार्थी होते. यंदा पाच लाख १० हजार सहाशे इतकी लाभार्थी संख्या झाली आहे. म्हणजे २५ हजार गॅसधारक वाढले आहेत. दोन गॅस असणारे एक लाख ४० हजार ६८३ शिधापत्रिका धारक होते.

गतवर्षी ३० हजार बिगर गॅसधारक जिल्ह्यात होते. त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेचा धडाका सुरु झाला, पण उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी गॅस महागल्याने गॅस बंद करत असल्याचा आरोप होत असताना २२ हजार लाभार्थी गतवर्षीपेक्षा वाढलेले दिसत आहे. तर एकूण जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांची संख्या लक्षात घेता गॅस असणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच पात्र लाभार्थींकडे गॅस कनेक्शन केव्हा उपलब्ध होईल. ही तफावत मात्र पुरवठा विभागाने गॅस एजन्सीकडून भरुन काढली की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातून २०१८ पासून केरोसीन बंद करण्यात आले आहे. या केरोसीन धारकांना गॅसची आवश्यकता अजून पूर्ण झाली नाही.

एका साधारण कुटुंबाचा वर्षाला चार सिलिंडरचा वापर
साधारण कुटुंबास एका वर्षात ४ सिलिंडर लागतात. असा पेट्रोलियम कंपन्यांचा कयास झाला. काही कुटुंबाकडून एखाद्या वर्षात ३ सिलिंडरचा वापर होवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...