आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीची हत्या:चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; पुसद तालुक्यातील बोरनगर येथील घटना

पुसद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना पुसद तालुक्यातील बोरनगर येथे मंगळवार, दि. १० मे रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी मारेकरी पतीला ताब्यात घेतले असून त्याने पत्नीची हत्या केल्याची कबूली पोलिसांसमोर दिली. मनुकाबाई कैलास राठोड वय ४२ वर्ष असे मृत्यू महिलेचे असून कैलास मोरसिंग राठोड वय ४५ वर्ष रा. बोरनगर असे मारेकरी पतीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पुसद तालुक्यातील बोरनगर येथील मनुकाबाई राठोड ह्या ऊसतोड कामगार असून त्या नाशिक येथे ऊस तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या दि. ९ मे रोजी परत मोठ्या मुलाबरोबर बोरनगर येथे त्यांच्या राहत्या घरी आल्या होत्या. कैलास राठोड हा देखील मजुरीसाठी बाहेरगावी गेला होता. तोही घरी परत आला होता.

घटनेच्या दिवशी मनुकाबाई व कैलास यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कैलास याने मनुकाबाई यांना मारहाण करीत भिंतीला डोके आपटले. या दरम्यान त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर कैलासने मनुकाबाई यांचा साडीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केला. दरम्यान हत्या केल्याची माहिती कैलास याने स्वतःहून शहर पोलिस ठाण्यात दिली.

बातम्या आणखी आहेत...