आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची  आत्महत्या ; पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना दारव्हा शहरातील जलाराम नगर येथे घडली असून या प्रकरणी पत्नीसह दोघांवर दारव्हा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुंडलिक सिताराम शिंदे (३७) रा. जलाराम नगर, दारव्हा असे मृत पतीचे नाव असून दुर्गा पुंडलिक शिंदे (३५) रा. जलाराम नगर असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे.

दारव्हा शहरातील जलाराम नगर येथील पुंडलिक शिंदे याचा पत्नी दुर्गा हिच्यासोबत घरगुती कारणावरून वाद होत होता. या वादाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून पुंडलिक याने दि. ३० ऑगस्टला विषप्राशन करून आत्महत्या केली होती.

बातम्या आणखी आहेत...