आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्य:आनंदाने कार्य केले, तर अशक्य‎ कार्यही सहज साध्य : डॉ. पाटेकर‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्याचा आनंद घेऊन कार्य केले तर अशक्य कार्यही सहज साध्य होते,‎ असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. ‎सुचिता पाटेकर यांनी केले.‎ शिक्षणाधिकारी (माध्य.),‎ अकोला जिल्हा गणित अध्यापक ‎मंडळाच्या वतीने लेडीज होम‎ क्लास द्वारा संचालित मनुताई कन्या‎ शाळेत झालेल्या स्पर्धा परीक्षेचे‎ गणित या कार्यशाळेत त्या‎ अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.‎

कार्यशाळेचे उद्घाटन लेडीज होम‎ क्लास सोसायटीच्या अध्यक्षा‎ पल्लवी कुळकर्णी यांच्या हस्ते‎ करण्यात आले. मुख्याध्यापिका‎ ऐश्वर्या धारस्कर, कैलास सांगळे,‎ माधव मुनशी प्रमुख पाहुणे म्हणून‎ उपस्थित होते. कार्यशाळेत‎ अमरावतीचे पी. आर. सालबर्डे,‎ अकोल्याचे कैलास सांगळे यांनी‎ कार्यशाळेत उपस्थित शिक्षकांना‎ मार्गदर्शन केले. एनएमएमएस‎ शिष्यवृत्ती, आरएमओ सारख्या‎ परीक्षांना विद्यार्थी आनंदाने सामोरे‎ जाण्यासाठी गणिताच्या शिक्षकांनी‎ आपापल्या शाळांतील विद्यार्थ्यांना‎ गणितातील विविध क्लृप्त्या आणि‎ बौद्धिक क्षमता चाचणीवरील‎ उदाहरणे अतिशय खुमासदार‎ पद्धतीने सांगण्यात आली.‎

शिक्षकांकडून १०० विचार प्रवर्तक‎ प्रश्न उमेश रेळे यांनी तयार करून‎ घेतले. कार्यशाळेत जिल्हाभरातून‎ एकूण १८२ गणित शिक्षक उपस्थित‎ होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक‎ मंडळाचे अध्यक्ष उमेश रेळे यांनी‎ मांडले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष रमेश‎ धुळे यांनी केले. आभार सचिव‎ माणिक गायकी यांनी मानले.‎ कार्यक्रमासाठी मंडळाचे विजय‎ पाथ्रीकर, वसंत पस्तापुरे, शशिकांत‎ बांगर, चंद्रकांत गव्हाणे, अनिल‎ चतुरकार आदींनी पुढाकार घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...