आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कॅच द रेन’:पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जलसंधारण विभागाला दिल्या आवश्यक सूचना

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपुर्ण देशात कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स हे अभियान राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जेव्हाजेव्हा पाऊस पडेल त्या प्रत्येक वेळी पावसाचे पाणी जमिनीत साठवता यावे, यासाठी नियोजनपूर्वक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यंत्रणेला दिल्या असून, सर्व नागरिकांनी जलशक्ती अभियानात सहभागी होऊन या अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले आहे.

जलशक्ती अभियानांतर्गत ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी महसूल भवन येथे घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुडधे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी नरेगामधून जलसंधारण, वृक्षरोपण व शोष खड्डे घेण्याचे तसेच सर्व शासकीय इमारती, अंगणवाडी व शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग व वृक्षारोपण करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये जल जागृती निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्याचे व विद्यार्थ्यांना जल शपथ देण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व नगरपालिकांनी वृक्षारोपण करण्याचे तसेच नगरपालिका क्षेत्रात बांधकामाची परवानगी देताना रेन वाटर हार्वेस्टिंग करण्यात येत असल्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

या अभियान कालावधीत जलसंधारणाची कामे करण्यात येणार असून पेसा क्षेत्र वगळता इतर सर्व ग्रामपंचायतीमध्ये ५ एप्रिल रोजी ग्रामसभा ठेवण्यात आली आहे. त्यात गावातील जलसंधारण कामाचा संरचनात्मक आराखडा मंजुरीसाठी ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. बैठकीला पाटबंधारे प्रकल्प, जनसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इत्यादी विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

लोकशाही दिनात ११६ तक्रारी प्राप्त
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण ११६ तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, केलेल्या कार्यवाहीचा आढावा दोन आठवड्यात घेण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लोकशाही दिन प्रसंगी अधिकाऱ्यांना दिला. प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे व विविध विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...