आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यवर्ती बँकेच्या संचालकाचे उपोषण‎:पुसद विभागात रिक्त जागा त्वरित भरा, इतर संचालकांचा पाठिंबा‎

यवतमाळ‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद विभागातील जिल्हा‎ मध्यवर्ती बँकेच्या शाखेत‎ कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने‎ रिक्त आहेत. ही पदे तातडीने‎ भरावी, ह्याकरीता बुधवार, दि. ८‎ मार्च जागतिक महिला दिनी‎ मध्यवर्ती बँकेच्या महिला‎ संचालिका स्मिता कदम यांनी‎ उपोषण केले. या उपोषणाला‎ इतरही संचालकांनी पाठींबा‎ दिला होता. शेवटी बँकेच्या मुख्य‎ कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुसद‎ विभागात सहा कर्मचाऱ्यांची‎ नेमणूक करून तातडीने त्यांना‎ कार्यमुक्तसुद्धा केले. तद्नंतर‎ उसाचा रस पाजून उपोषणाची‎ सांगता करण्यात आली.‎ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या‎ पुसद विभागात १९ शाखा आहेत.‎ अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शाखेत‎ येणाऱ्या सभासदांना प्रचंड त्रास‎ सहन करावा लागत आहे.‎ स्थानिक संचालकांना डावलून‎ काही कर्मचाऱ्यांची परस्पर‎ बदली सुद्धा केल्या जात आहे.‎ त्यामुळे संतप्त झालेल्या महिला‎ संचालिका स्मिता साहेबराव‎ कदम यांनी बुधवार, दि. ८ मार्च‎ जागतिक महिला दिनीच बँकेच्या‎ मुख्य शाखेसमोर उपोषणाला‎ सुरूवात केली. या उपोषणाला‎ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे‎ संचालक राजूदास जाधव,‎ शिवाजी राठोड, स्नेहल भाकरे,‎ प्रकाश पाटील देवसरकर,‎ आशिष लोणकर, अनुकूल‎ चव्हाण, आदी संचालकांसह‎ साहेबराव कदम, राहुल‎ कानारकर यांनी पाठींबा दिला.‎

या बाबीची गांभीर्याने दखल घेत‎ बँकेचे अध्यक्ष, उपध्यक्षांनी‎ कर्मचाऱ्यांची नेमणूक तातडीने‎ करावी, असे स्पष्ट आदेश मुख्य‎ कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले‎ होते. दुपारच्या सुमारास बँकेचे‎ मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद‎ मिरगे, उपसरव्यवस्थापक प्रवीण‎ दुधे यांनी उपोषणकर्त्यांची भेट‎ घेतली. सहा कर्मचाऱ्यांची‎ नेमणूक केली असून, त्यांना‎ कार्य मुक्त केल्याचे सांगितले.‎ यासंदर्भातचे लेखी पत्र‎ संचालकांना दिले. तद्नंतर‎ उसाचा रस पाजून उपोषणाची‎ सांगता करण्यात आली.‎ ‎ ‎ तर सभेवर बहिष्कार टाकू‎ ‎ पुसद विभागातील‎ शाखेमधील रिक्त पदी‎ कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी,‎ अशी मागणी वारंवार केली.‎ मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी‎ ह्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. आता‎ उपोषणाचा मार्ग निवडल्याने‎ सहा कर्मचाऱ्यांची नेमणूक‎ केली. ते कर्मचारी त्वरीत रूजू‎ होणे अपेक्षीत आहे.

अन्यथा‎ गुरूवार, दि. ९ मार्च रोजी‎ बोलावण्यात आलेल्या विशेष‎ सभेवर बहिष्कार टाकू असे‎ स्मिता कदम, संचालक,‎ जिल्हा बँक यांनी सांगितले.‎ ‎ रूजू न झाल्यास कारवाई‎ करू‎ रिक्त पदाची आकडेवारी‎ बघता नव्याने सहा कर्मचाऱ्यांची‎ नेमणूक पुसद विभागात करण्यात‎ आली आहे. दोन दिवसांपूर्वीच‎ दोघांना कार्य मुक्त केले. दोघांना‎ बुधवार, दि. ८ मार्च रोजी कार्य‎ मुक्त केले. तर दोघे जण सुट्टीवर‎ आहेत. त्यांनासुद्धा त्वरीत कार्य‎ मुक्त करू. नेमणूक केलेले‎ कर्मचारी रूजू न झाल्यास‎ त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई‎ केल्या जाईल असे मुकुंद‎ मिरगे, मुख्य कार्यकारी‎ अधिकारी, यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...