आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:देशात पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमती त्वरित कमी करा; बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या नेतृत्वात ढाणकीत महागाई धोरणाच्या विरोधात आंदोलन

ढाणकी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाईच्या उडालेल्या भडक्यात देशातील शेतकरी, मजूर, व्याव्सायिक व सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे. जीवनावश्यक वस्तुच्या किंमती गगनाला भिडल्या असून उज्वला योजनेचा मोठा गाजा वाजा करून सबसीडीच्या दरात दिलेले गॅस सिलिंडर आज खरेदी करतांना महिलेच्या डोळयात अश्रू येत आहे. लाकूडफाटा जळताना त्यापासून निघणाऱ्या धुरा पासून सामान्य कुटुंबातील महिलेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या मोदी सरकारने काही कुटुंबांना मोफत आणि सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन दिलेत. परंतू हल्लीच्या काळात गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती मजूर वर्गांना परवडत नसल्याने ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुली कडे वळल्या आहेत.

मोदी सरकारच्या काळात जगण्यापेक्षा मरणे सोपे झाले असून लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या सरकारला आवाहन करतो की, पेट्रोल, डिझेल व खाद्यतेलाच्या किंमती कमी करा नाहीतर खुर्ची खाली करा, असे असा अवाज मोदी सरकारच्या विरोधात बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी उठविला. ते दि. १ एप्रिलला स्थानिक गांजेगाव रोडवरील काँग्रेसच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनाच्या जाहिर सभेत ते बोलत होते.

उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहर काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या महागाई धोरणाच्या विरोधात धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी किशोर ठाकुर, रामराव गायकवाड, सुनीता घोडे, यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टिका केली. पुढे बोलतांना बाळासाहेब चंद्र म्हणाले की, भारतात लोकशाही आहे. परंतू मोदी सरकार लोकशाहीची गळचेपी करूण हुकूमशाही निर्माण करण्याचा घाट घालत आहे.

यावेळी व्यापारी काँग्रेसची तालुका अध्यक्ष रूपेश भंडारी, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल तुपेकर, ढाणकी पालिकेचे उपाध्यक्ष शेख जहीर भाई, उमरखेड जिनप्रेसचे संचालक बाबूराव नरवाडे, ढाणकी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रविण जैन, रमेश गायकवाड, सचिन तोटेवाड, बंटी वाळके, शेख जब्बार भाई, ओमाराव चंद्रे, अविनाश पांडे, नगरसेवक शेख इरफान, शेख अहमद भाई, प्रेमराव धनवर, शेख बशीर भाई, शिवाजी वैद्य, राजू सावतकर, गोलू मुनेश्वर, नगरसेवक शंकर ताटीकुंडलवार, सुधाकर महाजन, मोहसीन भाई, अफरोजभाई, सुनीता घोडे, द्रौपदी मोरे, नगरसेविका ज्योती ओमाराव चंद्रे, माय यंनगुंदलवार, गुंडेवार बाई, जिंतूरकर बाई, माकोडे बाई, प्रेमिला भगत, पाईकराव आंदोलनात सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...