आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरक्षण हक्क कृती समितीच्या मोर्चेकऱ्यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली १ मे रोजी काढला होता, महाराष्ट्र दिन तथा जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून मागासवर्गीयांच्या विवीध मागण्या राज्य सरकार सोडवत नाही याबद्दल जमलेल्या अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी खंत व्यक्त केली.
माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी खंत व्यक्त केली की, हिंदुत्वासाठी लढणाऱ्या राजकीय पक्षांकडून आदिवासी, भटक्या विमुक्त आणि बारा बलुतेदार, ओबीसी या घटकांवर प्रचंड अन्याय चालू केला आहे. अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा संबैधानिक हक्का पासून वंचित ठेवण्यात येत आहे. बढतीमधील आरक्षण, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, भटके विमुक्त, आणि बाराबलुतेदार, यांचा क्रिमिलियरचा प्रश्न विनाकारण राज्यमंत्री मंडळात निर्णय न घेता त्यांना विनाकारण झुलवत ठेवण्याचे कटकारस्थान चालु आहे. राज्य सरकार भारतीय घटनेची पायमल्ली करीत आहे, असंवैधानिक निर्णय घेत आहेत, आणि म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राज्यपाल भगत सिंग कोष्यारी यांच्याकडे बहुजन नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली.
या मोर्चाचे आयोजन आरक्षण हक्क कृती समितीच्या राज्य निमंत्रक हरिभाऊ राठोड, अरुण गाडे, एस. के. भंडारे, सुनील निरभवणे, आत्माराम पाखरे, सिद्धार्थ कांबळे, मूर्ती राठोड भारतकुमार वंदिले, महेश भट्ट, नंदू पवार, बाळासाहेब पांचाळ, रमेश भोईर, राजेश चव्हाण, अप्पा भालेराव आदींनी केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.