आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:महागाव शहरात घन कचऱ्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाला सुरुवात; घनकचरा व्यवस्थापनावर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे लक्ष

महागाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दरदिवशी निघणाऱ्या घन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून शहर स्वच्छ ठेवण्यावर नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्यासाठी ही चांगली बाब ठरणार आहे. महागाव शहरात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राटच काढण्यात आलेला नव्हता.

त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचून घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेता नगर पंचायतच्या नवनिर्वाचित अध्यक्षा करूणा ना. शिरबीरे, उपाध्यक्ष सुरेश नरवाडे, आरोग्य व स्वच्छता सभापती प्रमोद भरवाडे यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करून घनकचरा व्यवस्थापनाचे नवे कंत्राट काढले.

या नव्या कंत्राटाला सुरूवात देखील करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांचा बॅकलॉग भरून निघणार असुन शहरात प्रभाग क्र. १ ते १७ मध्ये ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या साफसफाई करण्यात येत आहे. शहरातील सर्वच शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे, सर्व थोर संत, महापुरुषांच्या तैल चित्राचा परिसर स्वच्छ केल्या जात असल्याने नागरिकांची कचरा व नाल्याच्या दुर्गंधी पासुन सुटका होत असल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...