आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:समजावून सांगण्याच्या प्रयत्नात‎ सख्ख्या भावानेच केली हत्या‎

उमरखेड‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावात वाद करून आलेल्या मोठ्या‎ गतिमंद भावाला समजावण्याचा‎ प्रयत्नातून झालेल्या वादात लहान‎ भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची‎ घटना उमरखेड तालुक्यातील विडुळ‎ गावाजवळील वांगी शेत शिवारात‎ मंगळवारी घडली होती. या प्रकरणी‎ मारेकरी भावाला उमरखेड पोलिसांनी‎ एका तासातच अटक केली असून,‎ त्याने हत्येची कबूली पोलिसांसमोर‎ दिली. गणेश माधव हातमोडे (वय‎ ४५) असे मृताचे नाव असून बालाजी‎ माधव हातमोडे (वय ३७) असे‎ पोलिसांनी अटक केलेल्या मारेकरी‎ भावाचे नाव आहे.‎ या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून‎ मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड‎ तालुक्यातील विडूळ येथील गणेश‎ हातमोडे याने मंगळवारी गावात वाद‎ करून घर गाठले. यावेळी लहान भाऊ‎ याने गावात वाद कशाला करतो म्हणून‎ समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र‎ गणेशने लहान भाऊ बालाजीच्या‎ हाताला चावा घेतला. त्यामुळे‎ संतापलेल्या बालाजी याने वांगी शेत‎ शिवारात गणेश याच्यावर काठीने वार‎ केले. यात गंभीर जखमी झालेल्या‎ गणेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी‎ उमरखेड पोलिस ठाण्यात विविध‎ कलमान्वये खूनाचा गुन्हा नोंद‎ करण्यात आला. घटनेचे गांभीर्य‎ लक्षात घेता उमरखेड पोलिसांनी‎ मारेकरी लहान भाऊ बालाजी हातमोडे‎ याला ताब्यात घेतले. बुधवारी‎ उमरखेड पोलिसांनी बालाजी हातमोडे‎ याला न्यायालयात हजर केले असता,‎ त्याची कारागृहात रवानगी करण्यात‎ आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...