आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाल्याचे पाणी वाहतेय चक्क रस्त्यावर

दिग्रस15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील नाल्या गेल्या कित्येक वर्षांपासून साफ केलेल्या नाहीत. त्यात शंकर टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डॉ.गड्डा यांच्या दवाखान्याजवळील नाली लीक झाल्याने या नालीतील दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहरातील मुख्य चौक आहे. येथे दारव्हा, पुसद वरून येणाऱ्या बस गाड्या थांबतात. बस पकडण्यासाठी प्रवासी येथेच थांबतात व बस मधून उतरतात. जवळच डॉ. गड्डा यांचा दवाखाना आहे, सोबतच डॉ. अटल यांचा देखील दवाखाना आहे. येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते. रस्त्यावर येणाऱ्या या दुषित पाण्यामुळे सर्वसामान्यांसह रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याच ठिकाणी चहा व नाश्त्याचे हॉटेल देखील आहेत. त्यामुळे हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांना अनेकदा नाकाला रुमाल लावून बसावे लागते.

बातम्या आणखी आहेत...