आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद:इस्लाम धर्मात दया, क्षमा, करुणा, दान अन् मानवतेला उपासनेचा दर्जा; दिग्रस येथे मौलाना काजी अबू जफर यांचे प्रतिपादन

दिग्रस15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लाम धर्माने करुणा, दया, क्षमा, दान व मानवतेला उपासनेचा दर्जा दिला असून दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात याचे प्रशिक्षण होत असते, असे मत दिग्रसचे काजी मौलाना अबू जफर यांनी व्यक्त केले. दिग्रस येथील ईदगाहवर विशेष नमाज व खुतब्यानंतर ते विशाल जनसागराला उद्देशून बोलत होते. यावेळी देशाच्या प्रगती, ऐक्य व अखंडतेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. रोजा इफ्तार व सर्वधर्मीय संमेलन आयोजित केल्याबद्दल त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस विभागाचे जाहीर आभार मानले.

यावेळी पोलीस विभागातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी मुस्लीम बांधवाना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. समस्त मुस्लीम समाजातर्फे माजी उपनगराध्यक्ष जावेद पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचा सत्कार केला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी ईद निमित्य दिग्रस शहरात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ पाटील यांनी लहान चिमुकल्यांसोबत फोटो काढणे पसंद केले. अतिशय शांततापूर्ण वातावरणात रमजान ईद सण साजरा झाला असून आतापर्यंत प्रथमच रमजान ईदला पोलीस अधीक्षकांनी हजेरी लावल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्यासह तहसीलदार सुधाकर राठोड, पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे, उपनिरीक्षक महेंद्र मानकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, माजी नगरसेवक केतन रत्नपारखी, शिवसेना शहरप्रमुख राहुल देशपांडे, उपशहरप्रमुख संदीप रत्नपारखी, सुरेश चिरडे, किशोर कांबळे, ऋषिकेश हिरास आदी हिंदू बांधवांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवाना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय ऐक्याचे अभिनव दर्शन घडले.

बातम्या आणखी आहेत...