आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडशा:करंजखेड शिवारात बिबट्याचा हैदोस ; सलग दोन दिवस दोन वासराचा पाडला फडशा

महागावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

करंजखेड शिवारात बिबट्याने पुन्हा हैदोस घालुन दोन वासरांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असुन ऐन हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या करंजखेड येथे बिबट्याने पुन्हा हैदोस घातला असुन दि. ३ जुन रोजी गुलाबराव आसोले यांच्या म्हशीचे लहान बछडे व नितीन भांगे यांच्या गाईचे वासरू बिबट्याने ठार केले आहे. मागील दोन महिन्यांमध्ये माणिकराव ठाकरे व अशोक भांगे यांची दोन वासरे बिबट्या मुळे दगावली. अनेक दिवसापासून रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. काल रात्री सुद्धा गावातील युवकांना बिबट्या सह दोन बछड्यांचे दर्शन झाल्याची माहिती आहे. वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करून बंदोबस्त करावा .

वन विभागाला कळवा ज्या शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडली त्यांना आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी बिबट्या दिसुन आल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क करावा, जेणेकरून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मदत होईल. नागरिकांनी भिती न बाळगता वन विभागाला सहकार्य करावे. देवेंद्र मुनेश्वर, वनपरिक्षेत्र अधिकारी, महागाव.

बातम्या आणखी आहेत...